वैदर्भीय कलावंत संमेलनात विदर्भातील अकारा जिल्ह्यातील कलावंतांची उपस्थिती, चंद्रपुरात पार पडले पाहिले वैदर्भीय कलावंत सम्मेलन (The presence of artists from 11th district of Vidarbha in the Vaidarbhaya Artists Conference was held in Chandrapur.)

Vidyanshnewslive
By -
0

वैदर्भीय कलावंत संमेलनात विदर्भातील अकारा जिल्ह्यातील कलावंतांची उपस्थिती, चंद्रपुरात पार पडले पाहिले वैदर्भीय कलावंत सम्मेलन (The presence of artists from 11th district of Vidarbha in the Vaidarbhaya Artists Conference was held in Chandrapur.)

चंद्रपूर :- झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील नाटयपंढरी म्हणून ओळखली जाते. विदर्भात सर्वात जास्त मनोरंजन कर हा झाडीपट्टी रंगभूमीमधूनच राज्य शासनाला प्राप्त होतो. तरीही झाडीपट्टी रंगभूमी ही ग्रामीण आदिवासी बहुमुलखातील हौशी रंगभूमी असल्यामुळे येथील कलावंत मुंबई - पुण्यापर्यंत कधीच पोहचू शकला नाही. येथील ग्रामीण कलावंतांच्या कलेला जागं करुन वैदर्भीय लोककला जिवंत ठेवण्याचे काम मायबोली झाडीपट्टी रंगभूमी गेली दोनशे वर्षा पासून करीत आहे. येथिल हौशी कलावंतांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कलेला प्रसिद्धी मिळावी, स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, या हेतूने दिनांक पाच सप्तेबर रोजी चंद्रमणी नॅशनल पार्क येथे पहिले 'वैदर्भीय कलावंत संमेलन' आयोजीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाला विदर्भातील अकरा जिल्ह्यातील कलावंत हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोरभाऊ जोरगेवार तथा पद्मश्री डॉ.परशुराम खुने यांचे हस्ते पार पडले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. इसादासजी भडके, मार्गदर्शक प्रसीद्ध कव्वाल सोमनाथदादा गायकवाड, तर प्रमुख अतीथी म्हनुन जेष्ट कलावंत के.आत्माराम, मुकेश गेडाम, कार्यक्रमाचे आयोजक सारिका उराडे स्वागताध्यक्ष म्हणून राहुल पेंढारकर उपस्थित होते. प्रसंगी झाडीपट्टी रंगभुमीवर सेवा देना-या रंगकर्मींसोबतच भजन मंडळ, तमाशा, गोंधळ, आदिवासी दंडार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक विदर्भातील विवीध लोककलावंतांचा सत्कार करन्यात आला. प्रसंगी पद्मश्री डॉ.परशुराम खुने, के.आत्माराम, मुकेश गेडाम, पंकज भाऊ खंदारेअकोला, जयंत साठे नागपूर, भारती हिरेखन नागपूर, देवा कावळे, आर्गनवादक गुरु कुमरे, तबलावादक पृथ्वी लोखंडे, गायीका जया बोरकर, गायीका प्रतीभा लोखंडे, युवराज प्रधान, एक्टोपॅडवादक जॉली मेश्राम, गायक शनी मेश्राम, तबलावादक चन्द्रमनी मेश्राम, नालवादक राजेन्द्र गेडाम सोबतच विवीध क्षेत्रात काम करना-या कलावंतांचा सन्मान भारत सरकार मान्यता प्राप्त कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने करण्यात आला.

         'कुरमाघर' हे नाटक समाज परिवर्तनाचे माध्यम पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, वैदर्भीय कलावंत संमेलनात कुरमाघर या दोन अंकी नाटकाचे डॉ परशुराम खुणे यांचे हस्ते पोस्टर प्रकाशित करण्यात आले. आदिवासी अतिदुर्गम भागात महिलांच्या मासिक धर्माच्या दरम्यान, त्यांना गवत, बांबू, ताटव्यानी बनलेल्या मातीच्या घरात ठेवण्याची प्रथा-परंपरा काळानुरुप प्रचलित आहे, ह्यालाच कुरमाघर असे म्हणतात. पावसाळ्यात अनेक आदिवासी स्त्रियांना पायपीट करावी लागते, अशावेळेस अस्वच्छतेमुळे जंतू-संसर्ग, साप विंचू चावून कुरमाघरात स्त्रिया मृत्यू मुखी पडल्याच्या अनेक घटना  घडल्या आहेत. अशा प्रथा परंपरांना नाहीत जमा करण्यासाठी, आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ प्रस्तुत, राहुल पेंढारकर लिखीत "कुर्माघर" अर्थात मुक्त झाले मी ?  हे दोन अंकी गोंडी झाडीबोली नाटक समाज परिवर्तनाचे माध्यम ठरत रंगभूमीवर पदार्पण करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)