धक्कादायक ! चंद्रपुरातील गोल बाजारात एका व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या ! (Shocking! A person was killed by cutting his throat with a sharp weapon in Gol Bazar in Chandrapur !)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! चंद्रपुरातील गोल बाजारात एका व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या ! (Shocking!  A person was killed by cutting his throat with a sharp weapon in Gol Bazar in Chandrapur !)

चंद्रपूर :- 3 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरातील गोल बाजार परिसरात भिक्षा मागून जीवन व्यापण करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. 65 वर्षीय मधुकर मंदेवार रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे, गोल बाजार परिसरात मधुकर हा भिक्षा मांगत होता. गोल बाजार परिसरातील दुकानदार मधुकर ला नामदेव म्हणून हाक मारीत होते, मात्र आता या घटनेनंतर बाजार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटना ही सकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान उघडकीस आली, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे, मृतक मधुकर वर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची माहिती आहे. शहर पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजपूत आदि दाखल झाले असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे व पुढील तपास सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)