चंद्रपूर गोल बाजारातील हत्या प्रकरणात 1 व्यक्तीला अटक, चंदपूर शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई (1 person arrested in the case of murder in Chandrapur Gol Bazar, Chandpur city police and local crime branch joint action)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर गोल बाजारातील हत्या प्रकरणात 1 व्यक्तीला अटक, चंदपूर शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई (1 person arrested in the case of murder in Chandrapur Gol Bazar, Chandpur city police and local crime branch joint action)

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील स्थानिक गोल बाजारात आजची पहाट सनसनी निर्माण करणारी ठरली एका अज्ञात व्यक्तीने भिक्षा मागून जीवन व्यापन करणाऱ्या मधुकर मंदेवार वय - 65 वर्ष रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली या घटनेची माहिती होताच चंद्रपूर शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या संयुक्त चमूने पोलीस तपास सुरु केला व अवघ्या काही तासात संशयाच्या आधारावर भूषण शालिकराम वय - 22 वर्ष रा. चिरोली ता.मूल जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून हा कालच चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एका गुन्ह्याच्या आरोपातून सुटून आला होता व गावाला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे गोलबाजारातील भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीचे पैसे हिसकावले व सदर हत्या ही पैसे चोरण्याचा विषयावरून झालेल्या झटापटीत सदर हत्याकांड घडला असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईने  अवघ्या काही तासात आरोपीला अटक करण्यात आली असून सदर प्रकरणात रिना जनबंधू, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, चंद्रपूर  सतिशसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक चंद्रपूर शहर, महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी सूत्रे हलवत आरोपीस अटक करण्याची कारवाई केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)