सेवानिवृत्ती प्रसंगी "आत्मसंवाद" पुस्तिकेचे प्रकाशन, व्यवसायाशी प्रामाणिकता हाच सेवानिवृत्तीचा आनंद - प्रमोद घोडे Release of "Aatsamvad" Booklet on Retirement Honesty in Business is the Joy of Retirement - Pramod Ghode

Vidyanshnewslive
By -
0

सेवानिवृत्ती प्रसंगी "आत्मसंवाद" पुस्तिकेचे प्रकाशन,  व्यवसायाशी प्रामाणिकता हाच सेवानिवृत्तीचा आनंद - प्रमोद घोडे Release of "Aatsamvad" Booklet on Retirement Honesty in Business is the Joy of Retirement - Pramod Ghode


बल्लारपूर -: शिक्षकी पेशा पिढी घडवणारा पेशा आहे. प्रत्येक शिक्षकाने 'भविष्यातील भारत' डोळ्यासमोर ठेवूनच विद्यार्थ्यांची  शैक्षणिक जडणघडण करावी. शिक्षकाने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले तर ते अशक्य नाही. कालांतराने जेव्हा विद्यार्थी भेटतात. म्हणतात," सर, मी तुमच्यामुळेच घडलो" हे वाक्य कर्तव्यतत्पर शिक्षकांची मोठी संपत्ती असते. व्यवसायाशी प्रामाणिकता हाच खरा सेवानिवृत्तीचा आनंद असतो. असे प्रतिपादन रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख प्रमोद घोडे यांनी सेवानिवृत्ती प्रसंगी काढले. स्थानिक गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात त्यांच्या सेवानिवृत्ती पर कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस .पोकळे होते. अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. बी .एम. बहिरवार, विशेष अतिथी म्हणून प्रा. घोडे यांचा जीवनपट पुस्तक रूपाने पुढे आणणारे  "आत्मसंवाद" या पुस्तकाचे शब्दांकन करणारे डॉ. विजय सोरते आणि डॉ. सुधीर मोते यांची उपस्थिती होती. आत्मसंवाद या पुस्तकाची मूळ संकल्पना प्रयोगशाळा परिचर मारुती पाटील यांची आहे. आम्हा सर्वांसमोर आदर्श व्यक्तिमत्व असल्याने ही संकल्पना पुस्तक रूपात आणल्याचे पाटील म्हणाले. याप्रसंगी प्रा. घोडे यांना महाविद्यालयाने सहपरिवार आमंत्रित केले होते. प्राचार्य पोकळे आणि उपप्राचार्य बहिरवार म्हणाले," प्रा. घोडे आम्हा सर्वांसाठी आदर्श शिक्षक आहेत. कोणत्याही शैक्षणिक कामाविषयी पूर्ण सेवा काळात त्यांनी तत्परता तर दाखवलीच, नॅक मूल्यांकनातही त्यांची मोठी मदत संस्थेला झाली आणि त्यांनी महाविद्यालय परिसरात जे वृक्षारोपण केले त्यांना मोठे केले. विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जाणीव हा खरोखरच अभिनंदनीय क्षण आहे. डॉ. सोरते आणि डॉ .मोते म्हणाले," एखाद्या प्रयोगशाळा परिचराने प्राध्यापकाच्या  जीवनपट समोर आणण्याची संकल्पना ठेवून पुस्तक निर्मिती करावी असा प्रसंग दुर्मिळच. एका खेड्यातून अशिक्षित आई बाबांचे स्वप्न प्राध्यापक होऊन पूर्ण करावे आणि त्याही पलीकडे सेवानिवृत्तीनंतर शेती व्यवसाय करून ग्रामीण जनतेशी नाळ जोडण्यासाठी जन्मगावी आधार घ्यावा, हे खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. याप्रसंगी प्रा. घोडे आणि त्यांच्या परिवाराचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि विठ्ठल रुक्माई चे मूर्ती देऊन सत्कार करण्यातआला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद खिराडे यांनी केले. प्रास्ताविक मारुती पाटील यांनी केले .तर आभार प्रा. दिनेश देशमुख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)