बल्लारपुरात शांतता समिती बैठक संपन्न मात्र शांतता समितीच्या बैठकीत स्थानिक पत्रकारांचा विसर ! (Peace committee meeting concluded in Ballarpur but local journalists were forgotten in the peace committee meeting !)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात शांतता समिती बैठक संपन्न मात्र शांतता समितीच्या बैठकीत स्थानिक पत्रकारांचा विसर ! (Peace committee meeting concluded in Ballarpur but local journalists were forgotten in the peace committee meeting !)


बल्लारपूर :- पत्रकार हा लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून ओळखला जातो समाजातील प्रत्येक चांगल्या वाईट बाबींची आपल्या लेखणी द्वारे समाजासमोर मांडणी करतो अशातच येणाऱ्या आगामी काळात अनेक सण, सोहळा, उत्सव निमित्त दरवर्षी शांतता समिती बैठक घेण्यात येते व या बैठकीला समाजातील प्रत्येक घटकांसह पत्रकारांना सुध्दा बोलाविले जाते मात्र यावर्षी प्रशासनाला स्थानिक पत्रकारांना बोलाविण्याचा विसर पडला की जाणीवपूर्वक डावलण्यात आले असा प्रश्न निर्माण होत आहे. याविषयीच्या अधिक माहिती नुसार बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये शुक्रवार दि.०१ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली. नियमाप्रमाणे या बैठकीत शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश असतो. मात्र, यंदाच्या या शांतता समितीच्या बैठकीत शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, यंदा प्रथमच या बैठकीत पत्रकारांना डावलण्यात आले. सण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असणाऱ्या या बैठकीत स्थानिक पत्रकारांना डावलल्यामुळे उपस्थित मंडळीही काही वेळासाठी अचंबित झाली. डावलण्याच नेमक कारण काय? हे बैठकीत उपस्थित असणाऱ्या अनेकांना पडला आहे. वेळ प्रसंगी प्रशासनाला जाब विचाराने आणि गरज पडल्यास प्रशासनाला धारेवर धरून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारानाचं या बैठकीत डावलने हा विसर असावा कि जाणीवपूर्वक केलेली कृती असा प्रश्न सध्या शहरात वर्तविला जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)