स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी माती माझा देश अभियान अंतर्गत बल्लारपुरात अमृत ​​कलश यात्रा Amrit Mahotsav of Independence and Amrit Kalash Yatra in Ballarpur under Majhi Mati Maja Desh Abhiyan

Vidyanshnewslive
By -
0

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी माती माझा देश अभियान अंतर्गत बल्लारपुरात अमृत ​​कलश यात्रा Amrit Mahotsav of Independence and Amrit Kalash Yatra in Ballarpur under Majhi Mati Maja Desh Abhiyan

बल्लारपूर :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "माझी माती माझा देश" हे अभियान संपुर्ण देशात राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन सदर अभियाना करीता नगर परिषद बल्लारपुर मार्फत अमृत कलश यात्रा दिनांक 21/09/2023 रोजी दुपारी 3.00 वाजता नगर परिषद कार्यालयातुन काढण्यात आली.'सदर यात्रेची सुरुवात, नगर परिषद कार्यालय, राऊत चक्की, कादरिया मज्जीद चौक, पंडीत दिनदयाल गार्डन, मिलिंद चौक, पुराना बसस्टैंड, जुनी नगर परिषद चौक, गोल पुलीया, सातनळ चौक, परत नगर परिषद कार्यालय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "माझी माती माझा देश" मधील अमृत कलश यात्रा हा देशभक्तीचा उपक्रम आहे हे लक्षात घेता शहरातील नागरीकांनी योगदान दिले. प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी देशभक्ती या कार्यक्रमाच्या माध्यमातुन वृध्दीगत होत असल्याने या कार्यक्रमामध्ये नागरीक सहभागी झाले न.प. क्षेत्रातील विविध प्रभागामधील माती अमृत कलश मध्ये जमा करण्यात आली. अमृत कलश यात्रा या उपक्रमाच्या माध्यमातुन शहरातील सर्व घरापर्यंत देशभक्ती पोहोचणे हे यात्रेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

        सदर अभियानात न. प. चे सर्व अधिकारी / कर्मचारी तथा मोठ्या संखेत बल्लारपुर शहरातील नागरीकांनी सहभाग नोंदविला तसेच सदर अभियानात सहभागी होऊन सदर अमृत कलश यात्रा अभियान यशस्वी राबविण्याबाबत श्री विशाल वाघ प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद, बल्लारपूर यांनी संपुर्ण अधिकारी/कर्मचारी तथा बल्लारपुर शहरातील नागरीकांचे आभार व्यक्त केले. या अमृत कलश यात्रेत प्रशांत गणवीर पाणीपुरवठा अभियंता, दिपक पंडीत अंतर्गत लेखापरीक्षक, रीना बहोत शिक्षण लिपीक, श्याम परसुटकर पाणीपुरवठा प्र. लिपीक, मंगेश सोनटक्के शहर समन्वयक, दिलीप वांढरे विजतंत्री, कमल शेंडे, शारदा अक्केवार, निखिल डाटा ऑपरेटर, मिश्रा जी व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग या सर्वांच्या सहयोगाने हि अमृत कलश यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)