बल्लारपूर शहरात बाप्पाचे जल्लोषात आगमन, बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत 72 गणेश मंड्ळाद्वारे गणेशजींची स्थापना (Bappa's jubilant arrival in Ballarpur city, establishment of Ganesh ji by 72 Ganesh Mandals under Ballarpur Police Station)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- १९ सप्टेंबर रोजी बाप्पाचे धडाक्यात आगमन झाले आहे. ७२ सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची संख्या चे प्रमाण कमी होत चालले आहे. मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरवात झाली आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बल्लारपूर शहरात यावेळी ५० सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली आहे. ग्रामीण भागा मध्ये २२ सार्वजनिक गणेश मंडळाने नोंदणी पूर्ण केली आहे. तसेच एक गाव एक गणपती ही संकल्पना ३ गावात राबविण्यात येणार आहे. त्यात केम तूकुम, मोहाळी तूकुम, आसेगाव आहे. तर बल्लारपूर शहरातील घरगुती गणपती 700 च्या वर स्थापना केले आहे. गणपती विसर्जन २८ सप्टेंबर ला होणार आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षी गणपती विसर्जन व मुस्लिम बांधवांची ईद ही एकाच दिवशी आली मात्र समजस्यांच्या भूमिकेतून ईद ची मिरवणूक सामाजिक सलोख्यातुन निघणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)