बल्लारपूर रेल्वे स्थानकावर 9 लाख रु च्या मुद्देमालसह 4 व्यक्तींना अटक, नागपूर लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई (4 persons arrested at Ballarpur railway station with goods worth Rs 9 lakh, action of Nagpur Lohmarg Local Crime Branch)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर 9  लाख रु च्या मुद्देमालसह 4 व्यक्तींना अटक, नागपूर लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई (4 persons arrested at Ballarpur railway station with goods worth Rs 9 lakh, action of Nagpur Lohmarg Local Crime Branch)

बल्लारपूर :- प्रवाशी गाड्यांमधील प्रवाशांचे किमंती ऐवज असलेले लेडीज बॅग, मोबाईल चोरांना  पकडण्यात स्थानीक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर पथकाला यश आले असून चार आरोपींना अटक केले आहे. त्यांच्या कडून ९ लाख रुपये चे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. १७ ऑगस्ट २०२३ रोजी फिर्यादी परमानंद टिकादास खत्री रा. आसमा कॉलनी लाईन नं. डी ७ सेंट्रल गार्डन च्या जवळ साकरी बिलासपुर छ.ग. हे गाडी क. ०७२५५ पटना स्पेशल गाडी ने आपले पत्नीसह कोच क. ए/ २ बर्थ क. ३२,२३ वरून प्रवास करीत असतांना रेल्वे स्टेशन बल्लारशाह येणे पूर्वी फिर्यादीची पत्नी टॉयलेट ला गेल्या असता अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे पत्नी टॉयलेट ला गेल्याने त्याचे गैरहजेरीचा फायदा घेवून त्यांची बर्थवर ठेवलेली ब्राउन रंगाची लेडीज बेंग त्यात सोन्याचे दागीने व रोख रूपये १८०००/- रू. असा एकूण ४.४३,०००/- रूपयाचा माल चोरून नेल्याने रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अप क. ३६३ / २०२३ कलम ३७९ भा. द. वी. चा गुन्हा दाखल झाले होते.

        गुन्हयाचे गांभीर्य बघता पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी दिलेल्या सूचनानुसार स्थानीक गुन्हे शाखे तर्फे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुप्त माहितगाराव्दारे माहिती मिळाली की, वारंगल, काझीपेठ कडून येणाऱ्या पटना स्पेशल, हिसार एक्स, चेन्नई जोधपुर एक्स. काझीपेठ दादर एक्स. या गाडयांवर प्रवाशांचे सामान चोरी करणारे चार संशयीत ईसम रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे येत आहेत, अशा माहितीवरून स्थानीक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर याचे एक पथक तयार करून रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे पाठविण्यात आले. गुप्त माहितीगाराने संशईत इसमाचे वर्णनासह दिलेल्या माहितीचे आधारे संशयीताचा रेल्वे स्टेशन बल्लारशाह परिसरात शोध घेत असताना १५ सप्टेंबर २०२३ रोजी चार संशयीत ईसम मिळून आले. सतीश रामदास चाबूकस्वार वय (३२ वर्षे) रा. रमाबाई आंबेडकर नगर तिसगाव औरंगाबाद जि. औरंगाबाद, विक्रम सुर्यकांत सुकनगे वय (३१ वर्षे) रा. बापशेटवाडी बाराहाळी ता. मुखेड जि. नांदेड, कैलाश गजीराम एरने वय (३७ वर्षे) रा. आंबेडकर चौक खंडाळा ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर, अरूण मोतीराम दरेकर (वय ३२ वर्षे) रा. अवधूतवाडी सम्राट नगर गजानन चौक पंचवटी नाशीक असे सांगीतले. चौकशीदरम्यान त्यांचेवर अधिक संशय बळावल्याने त्यांचे सामानाची तपासणी केली असता त्यांचेकडे विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल, एक टॅब, एक ट्रॉली बॅग असा एकूण १,३१,०१७ /- रूपयाचा मुद्देमाल मिळून आला. चौकशीदरम्यान त्यांनी रे.पो.स्टे. वर्धा अप क. ३६३/ २०२३ कलम ३७९ भादवीचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांनी रितसर अटक करून नमुद आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला.

             नमुद आरोपींनी दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यातील व ईतर गुन्ह्यातील सोन्याचे दागीणे वितळवून तयार केलेली लगड वजन १४० ग्रॅम कि ७,००,०००/ रु. तसेच रे पो स्टे नागपूर अप क ११३९/ २०२३ व रे, पो. स्टे. वर्धा अप क. ४११/२०२३ कलम ३७९, ३४ भा.द.वी मधील व इतर गुन्ह्यातील कंपनीचे एकूण १३ अँड्रॉइड मोबाईल किमत २.२४,०००/- रूपये, एक Acer ON ८ T4-८२ L TAB किमत १२०००/- रू. व ट्रॉली बॅग आतील समानासह किमत ३२००/- रू. असा एकूण ९,२४,००० /- रूपयाचा मुद्देमाल नमुद आरोपीकडून हस्तगत करण्यात आला असून नमुद गुन्हयाव्यतीरीक्त उर्वरीत सोन्याची दागीने बनवून केलेली लगड, अँड्रॉइड मोबाईल, टॅब व ट्रॉली बैग मालकांचा शोध घेणे सुरू आहे. सदरची कार्यवाही डॉ. अक्षय शिंदे, पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपुर, श्रीमती वैशाली शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपुर यांचे मार्गदर्शनात विकास कानपिल्लेवार पोलीस निरीक्षक, स्था.गु. शाखा यांचे सुचनेनुसार स्था.गु शाखेचे पोउपनि प्रविण भिमटे, पो. हवा. महेंद्र मानकर, पो. ना. विनोद खोब्रागडे, पो.ना. नितीन शेंडे, पो.शि. गिरीश राउत, पो.शि. मंगेश तितरमारे रे.पो.स्टे वर्धा येथील सपोनि श्रीमती बोयने पो हवा, विजय मुंजेवार, पो.शि. राकेश वासनीक व पो.शि. संदेश लोणारे तसेच सायबर सेल चे पो.शि. सदीप लहासे यांनी केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)