चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित 40% महाविद्यालयाचे नॅक शिल्लक ( 40% NAC Balance of College Affiliated to Gondwana University in Chandrapur Gadchiroli District)
गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या जवळपास 40 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन अद्यापही झालेले नाही. गोंडवाना विद्यापीठाने नुकतेच आपले नॅक मुल्यांकन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा एकदा अशा महाविद्यालयांना नोटीस बजावला आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय सहसंचालक यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे झाली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, विभागीय सहसंचालक आदी उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठनिहाय संलग्न महाविद्यालये, नॅक मूल्यांकन झालेली महाविद्यालये यांचा आढावा घेण्यात आला.
मुल्यांकन पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना नोटीस देणे, दिलेल्या कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांचे पुढील काळात नवीन प्रवेश थांबविणे, प्रवेश संख्या कमी, मर्यादित करणे तसेच त्यांची परीक्षा केंद्रे रद्द करणे, अशी कारवाई करण्याबाबत पाटील यांनी शिक्षण संचालकांना तसेच विद्यापीठांना निर्देश दिले आहेत. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्व महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. नॅक मूल्यांकनासाठी नोंदणी केलेल्या, मूल्यांकन प्राप्त आणि मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांची माहिती, नावे विद्यापीठांनी संकेतस्थळावर अद्ययावत करून प्रसिद्ध करावी, तंत्रशिक्षण, औषधनिर्माणशास्त्राचे पदविका शिक्षण देणार्या संस्थांनी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून (एनबीए) मूल्यांकन करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी तंत्रशिक्षण विभागानेही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या