विसापूर टोल नाक्याजवळ 2 ट्रक गुटख्यासह जवळपास 1 करोड 11 लाख रु चा मुद्देमाल जप्त ! (2 trucks with Gutkha seized near Visapur toll gate worth Rs 1 crore 11 lakh !)

Vidyanshnewslive
By -
0

विसापूर टोल नाक्याजवळ 2 ट्रक गुटख्यासह जवळपास 1 करोड 11 लाख रु चा मुद्देमाल जप्त ! (2 trucks with Gutkha seized near Visapur toll gate worth Rs 1 crore 11 lakh !)

चंद्रपूर :- महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे तंबाखूयुक्त पदार्थ जप्त करण्याची सर्वात मोठी घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या अन्न व औषध विभाग ही तस्करी थांबविण्यासाठी अयशस्वी ठरला आहे, चंद्रपुरात सुगंधित तंबाखू विक्री करणारे वसीम, जयसुख सारखे लोक युवकांना कॅन्सरच्या वाटेवर जाण्यास भाग पाडण्याचे काम करीत आहे. वर्ष 2012 पासून राज्यात सुगंधित तंबाखूजन्य पदार्थावर प्रतिबंध लावण्यात आला होता, मात्र त्यानंतर चंद्रपूर व इतर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची विक्री खुलेआम होत आहे. 

           19 सप्टेंबरला राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना 2 ट्रक सागर पान मसाल्याचा तब्बल कोट्यवधी रुपयांचा माल घेऊन निघाले होते, मात्र याची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील एकाही विभागाला मिळाली नाही, पण नागपूर व अमरावती येथील अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत ते 2 ट्रक पकडले. ट्रक क्रमांक TS 07 UE 7206 आणि MH 25 U 1211 क्रमांकाचा ट्रक विसापूर टोल नाक्याजवळ सायंकाळी 5 वाजता पकडल्या गेल्या, वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांचा सागर पान मसाल्याचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात 2 ट्रक चालक व वाहक अश्या 4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली असून सदर माल हा कर्नाटक राज्यातील बिदर मधून मध्यप्रदेश राज्यात नेत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई अन्न व औषध विभागाकडे देण्यात आली असून प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)