धक्कादायक ! बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत कळमना वनखंड उपक्षेत्रामधील वाघाचा एक अशक्त बछडा तर 2 वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळले, वनगुन्हा दाखल पुढील तपास सुरु (Shocking ! One weak tiger cub and 2 tiger cubs were found dead in Kalmana forest sub-zone under Ballarpur forest area, forest crime registered further investigation started)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत कळमना वनखंड उपक्षेत्रामधील वाघाचा एक अशक्त बछडा तर 2 वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळले, वनगुन्हा दाखल पुढील तपास सुरु (Shocking ! One weak tiger cub and 2 tiger cubs were found dead in Kalmana forest sub-zone under Ballarpur forest area, forest crime registered further investigation started)

बल्लारपूर :- दिनांक 07.09.2023 ला बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कळमणा उपक्षेत्रामधील क्षेत्रीय कर्मचारी हे वनात गस्तीवर असतांना त्यांना नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक अशक्त वाघाचा बछडा दिसुन आला. त्याला तात्काळ रेसक्यु करुन प्राथमीक उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. बछडा ही मादी असुन तीचे वय अंदाजे 5 महिने असल्याने तीला वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर पशुवैद्यकीय अधिकारी यांचे निगरानीत ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर त्याच परिसरात इरतत्र ठिकाणी दोन वाघाचे बछडे मृता अवस्थेत आढळुन आले. त्याबाबत आधी मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08945/223615/2023 दिनांक 07.09.2023 जारी करुन मृत वाघाचे बछडाचे शव ताब्यात घेवुन शवविच्छेदना करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. मृत दोन्ही बछडाचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर व डॉ. दिलीप पी. जांभुळे, पशुधन विकास अधिकारी, बल्हारपुर यांनी केले असुन शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट करता येईल. सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती श्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर श्री. शेख तौसीफ शेख हैदर, सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) यांचे मार्गदर्शनात श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे करीत आहे. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता श्री. बि. टि. पुरी, क्षेत्र सहाय्यक, कळमणा व वनरक्षक श्री. एस.पी. नन्नावरे, श्री. पि.एच. आनकाडे, श्री. एम. जी. धाईत, कु. भारती तिवाडे, श्री. एस. एस. नैताम, श्री.टि.ओ. कामले, श्री. एस. एम. बोकडे, श्री. ए. बी. चौधरी व PRT Team कळमणा व किन्ही यांनी सहकार्य केले. नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)