धक्कादायक ! चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती येथील प्रस्तावित विमानतळाला केंद्रीय वनमंत्रालयाची नकारघंटा मिळाल्याची सूत्रांची माहिती (Shocking ! According to sources, the proposed airport at Murthy in Chandrapur district has been rejected by the Union Forest Ministry)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती येथील प्रस्तावित विमानतळाला केंद्रीय वनमंत्रालयाची नकारघंटा मिळाल्याची सूत्रांची माहिती (Shocking !  According to sources, the proposed airport at Murthy in Chandrapur district has been rejected by the Union Forest Ministry)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती नव्याने उभारण्यात येत असलेले ग्रीनफिल्ड एअरपोर्ट ... देशातील 21 ठिकाणी ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचा नागरी उड्डाण मंत्रालयाने निर्णय घेतला होता. देशातील कुठल्याही प्रकल्पाला वन विभागाचा हिरवा कंदील आवश्यक आहे. वन विभागाकडून हिरवा कंदील मिळण्याचा दृष्टीने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीचा होकार मिळणं आवश्यक असतं. मूर्ती विमानतळासाठी जवळपास 63 हेक्टर वनजमीन दिली जाणार होती. या साठी 7 जुलैला दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने आपली बाजू जोरदार पणे मांडली मात्र वाघांचा अधिवास धोक्यात येऊ नये म्हणून हा प्रस्ताव नाकारण्यात आला. मात्र यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती या ठिकाणी विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने नकार दिला आहे. विमानतळाच्या प्रस्तावित जागेत वन्यप्राण्यांचा विशेषतः वाघांचा अधिवास असल्याने आणि हा Tiger Corridor असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. मूर्ती विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार मूर्ती येथील विमानतळाचा परिसर वन्यजीवांचा भ्रमण मार्ग म्हणून दाखविला आहे. त्यामुळे या विमानतळाला वन्यजीव प्रेमींचा आधीच विरोध होता. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्याने वन्यजीव प्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलंय.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)