धक्कादायक ! बलात्कार पीडितेने पोलीस स्टेशनमध्येच विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न, चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सूरू असल्याची माहिती (Shocking! The rape victim tried to commit suicide by consuming poison in the police station, it is reported that she is undergoing treatment at the District General Hospital in Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील वरोरा पोलीस ठाण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने सहायक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यातमध्येच विष घेतल्याची घटना घडली आहे. पीडित महिला अंदाजे 36 वर्षांची असून तिने ऑक्टोबर 2022 मध्ये आरोपी इरफान शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर 376 आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक झाली होती. मात्र या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यावर आरोपी आणि त्याचे नातलग त्रास देत असल्याचा पीडित महिलेचा आरोप होता. मात्र चौरे यांच्यावर कारवाई न झाल्याने महिलेने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये विष घेतले. महिलेला पहिले वरोरा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. सोबतच आरोपींना वरोरा पोलीस स्टेशनचे निलेश चौरे मदत करत असल्याचा देखील महिलेने आरोप केला होता, आरोपींना मदत करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्याची महिलेने शनिवारी वरोरा येथे प्रेस कॉन्फरन्स घेत मागणी केली होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)