बल्लारपूर नगर परिषदेमार्फत स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा " उपक्रम राबविणेबाबत (Regarding implementation of "Har Ghar Tiranga" activity under Amrit Mahotsav of Independents through Ballarpur Nagar Parishad)
बल्लारपूर :- भारतीय स्वांतत्र्याला 76 वर्ष पुर्ण होत असल्याने दैदिप्यमानव इतिहासाचे अभिमानपुर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13/08/2023 ते दिनांक 15/08/2023 या कालावधीमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे "हर घर तिरंगा" हा उपक्रम नगर परिषद बल्लारपूरव्दारे राबविण्यात येत आहे. दिनांक 11/08/2023 ते 14/08/2023 ला न.प. बचत गटामार्फत खालील दिलेल्या स्थळावर तिरंगा वितरण केद्र लावण्यात येणार असुन नागरीकांना राष्ट्रतिरंगा दिलेल्या स्थळावरुन रुपये 15/- प्रति नग खरेदी करण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात येतील बल्लारपुरातील 10 ठिकाणी तिरंगा वितरण स्थळी होणार आहेत. बस स्टॉप (नविन), महात्मा गांधी कॉम्प्लेक्स (जुना बस स्टॉप), पेपरमील कला मंदीर, महात्मा गांधी पुतळा (वस्ती), कादरिया मस्जीद (पेपर मील), फॉरेस्ट गेट जवळ, वैशाली चौक (टेकडी विभाग), गुरुनानक कॉलेज जवळ, कॉलरी गेट जवळ, न.प. कार्यालय (नविन) वरील ठिकाणी दिनांक 11/08/2023 ते 14/08/2023 वेळ सकाळी 10.00 ते सांय 5.30 वाजेपावेतो राष्ट्र तिरंगा उपलब्ध राहील. भारतीय ध्वज सहिंतेचे पालन व्हावे व जानते - अजानतेपणी राष्ट्र ध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता नागरीकांनी घ्यावी व दिनांक 13/08/2023 ते 15/08/2023 या दरम्यान "हर घर तिरंगा" या अभियानात बल्लारपूरातील सर्व नागरीकांनी सामील व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन बल्लारपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी, श्री. विशाल वाघ यांनी नागरीकांना केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या