राज्याचं विरोधी पक्ष नेतेपद कॉंग्रेसकडे, विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्याकडे जबाबदारी सोपविल्याची सूत्रांची माहिती (According to the sources, the responsibility of the state leader of the opposition party has been handed over to the Congress and the leader of the opposition party to Vijay Vadettiwar.)

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. नियमानुसार, विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे. " महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी कॉंग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन, मी २०१८-१९ मध्ये युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष असतांनाही वड्डेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेस ते संघटनेला कायम मदत करायचे. अपेक्षा आहे की, ते जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतील व सरकारला योग्य प्रश्नांवर जाब विचारतील." याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)