धक्कादायक ! बल्लारपुरात 9 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग, पालकात चिंतेचे वातावरण (Shocking ! 9-year-old student molested in Ballarpur, worry among parents)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील गौरक्षण वार्ड परिसरातील कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेणाऱ्या चवथ्या वर्गात शिकणाऱ्या 9 वर्षीय विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील स्कुल बस चालक असलेल्या मो.अजीज 35 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला असल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेचे वृत्त कळताच शाळेच्या संस्था चालकांनी सदर स्कुल बस चालकाला कामावरून काढून टाकल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मागील 3 वर्षापासून सदर बसचालक त्या शाळेत कार्यरत होता मात्र घटना उघडकीस येताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून सदर घटनेची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दाखल झाली या तक्रारी वरून पोलिसांनी भां.द.वी च्या कलम 354 व पॉस्को 8,12 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आल्याचं वृत्त सूत्रांकडून प्राप्त झाले असून पुढील तपास उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहा सोलंकी पोलीस उपनिरीक्षक बल्लारपूर करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या