ताडोबा बफर प्रशासनाची संवेदनशीलता आणि गतिमानता वाघाच्या हल्ल्यात मृत कुटुंबाला 2 दिवसात 25 लाखाची नुकसान भरपाई, मोहर्ली वनपरिक्षेत्रातील घटना (Sensitivity and agility of Tadoba buffer administration Compensation of 25 lakhs to family killed in tiger attack in 2 days, incident in Mohrli forest area)

Vidyanshnewslive
By -
0

ताडोबा बफर प्रशासनाची संवेदनशीलता आणि गतिमानता वाघाच्या हल्ल्यात मृत कुटुंबाला 2 दिवसात 25 लाखाची नुकसान भरपाई, मोहर्ली वनपरिक्षेत्रातील घटना (Sensitivity and agility of Tadoba buffer administration Compensation of 25 lakhs to family killed in tiger attack in 2 days, incident in Mohrli forest area)

चंद्रपूर :- दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी भद्रावती तालुक्यातील टेकाडी गावातील महिला श्रीमती लक्ष्मीबाई रामराव कन्नाके, वय 60 वर्ष शेतात काम करतांना वाघाने हल्ला करून ठार केले. - वनविभागाने तात्काळ कार्यवाही करून मृतकाचे वारस पती श्री. रामराव जगन्नाथ कन्नाके यांचे बँक खात्यात 10 लाख रुपये अदा करून मृतकाचे सर्व वारस यांचे बँक खात्यात उर्वरित 15 लाख रुपये फ़िक्स डीपॉझीट जमा करण्यात येणार याकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चे उपसंचालक श्री. कुशाग्र पाठक यांनी पुढाकार घेऊन वारसांना तात्काळ मदत मिळवून दिली. भविष्यामध्ये मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून गावामध्ये जनजागृती करीत बोर्ड आणि बॅनर लावण्यात आले. वन्यप्राणी यांच्या पासून सावधगिरी बाबत ऑडीओ क्लिप तयार करून लाउडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात येत असून विशेष व्याघ्र संरक्षण दल यांची टीम आणि 25 सदस्य PRT यांचेद्वारे शेत शिवार परिसरात वाघाच्या हालचाली टिपत आहे. सदर परिसरात 20 कॅमेरा ट्रॅप च्या मदतीने सनियंत्रण कार्यवाही सुरु आहे. शेतकरी यांना मुखवटे वाटप करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन यंत्रणा यांचे मार्गदर्शक सुचने अन्वये समिती गठीत करण्यात आली असून समितीने केलेल्या उपाययोजना अवलंबिल्या जात असून भविष्यामध्ये मनुष्यहानी टाळण्यासाठी उपसंचालक (बफर) श्री. कुशाग्र पाठक यांचे मार्गदर्शन खाली मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. संतोष थिपे कार्यवाही करीत असून अशी माहिती संतोष थिपे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली(बफर) यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)