संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी समीर केने यांची निवड (Selection of Sameer Kane as Chairman of Sanjay Gandhi Niradhar Yojana Committee)
बल्लारपूर :- समाजातील दिन दुबळे व कुटुंबीयांनी नाकारलेल्या वयोवृद्ध नागरिकांनी आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना राबविण्यात येते बल्लारपुरात संजय गांधी निराधार योजना समितीच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी समीर केने यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सदर समिती घोषित केली असून त्यात समितीच्या अध्यक्षपदी समीर केने तसेच सदस्य म्हणून किशोर मोहुर्ले, सतीश कनकम, मल्लेश कोडारी, राजेश दासरवार, अनिल मोरे, रूमदेव डेरकर, वैशाली जोशी, लीना कुसराम ई प्रभृतींचा समावेश आहे. सदर समितीचे तहसीलदार हे पदसिद्ध सचिव आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या