भाजपने पक्षसंघटनेत केले फेरबदल, राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलले, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी राहुल पावडे, तर चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरीश शर्मा यांची नियुक्ती (BJP has reshuffled the party organization, district presidents across the state have been changed, Rahul Pavde has been appointed as the district president of Chandrapur city, and Harish Sharma has been appointed as the district president of Chandrapur rural.)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- राज्यातील आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने भाजपानेही पक्ष संघटनेत बदल केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपात अंतर्गत पदाधिकारी फेरबदल होतील असे बोलले जात होते. त्यात अखेर संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात अनेक प्रस्थापितांना धक्का दिल्याचे दिसून येते. भाजप नागपूर शहराध्यक्षपदी बंटी कुकडे तर जिल्हाध्यक्षपदी सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभाजन करून एका जिल्ह्यात दोन-तीन अध्यक्ष भाजपाने दिले आहेत. विदर्भातील जिल्हाध्यक्ष पाहता चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष पदी राहुल पावडे तर चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदी बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच 2024 च्या आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील भाजपने आपले जिल्हाध्यक्ष बदलले असून तरुण रक्ताला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)