महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या एम.ए अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी गोंडवाना विद्यापीठातून तिसरी मेरिट MA Economics student of Mahatma Jyotiba Phule College Ballarpur 3rd Merit from Gondwana University

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या एम.ए अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी गोंडवाना विद्यापीठातून तिसरी मेरिट MA Economics student of Mahatma Jyotiba Phule College Ballarpur 3rd Merit from Gondwana University

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागातून एम.ए अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी असलेली कु. करिश्मा शत्रुघन मिलमिले ही यावर्षी घेण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परिक्षेत मोठे यश प्राप्त केले असून या विद्यार्थिनीने गोंडवाना विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून तिसरी मेरिट येण्याचा बहुमान मिळविला असून या विद्यार्थिनीने एकूण 775 गुण मिळविले असून तिचा CGPA 9.69 प्राप्त केले असून तिच्या या यशाबद्दल बल्लारपूर शहरातील महात्मा  ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. बादलशाह चव्हाण, प्रा. सुनिल कायरकर, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), यांच्यासह महाविद्यालयाच्या कनिष्ठ-वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी कु. करिश्मा मिलमिले या सत्कारमूर्तीने आपल्या या यशाचं श्रेय आपले आई वडील, कुटुंबीय, व प्राध्यापक वर्ग यांना दिले.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)