विद्यापीठ अनुदान आयोगाने सहायक प्राध्यापकांच्या नियुक्ती संदर्भात नियम बदलले असल्याची माहिती (Information that the University Grants Commission has changed the rules regarding the appointment of Assistant Professors)

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET/SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या संदर्भात सूत्राच्या माहितीनुसार UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. आता NET/SET/SLET हे सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी किमान निकष असतील अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगने दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)