राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर ! The reservation draw program for Gram Panchayat elections in the state has been announced !

Vidyanshnewslive
By -
0

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर ! The reservation draw program for Gram Panchayat elections in the state has been announced !

मुंबई :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना, आरक्षण झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार, १६ जून २०२३ रोजी आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. बुधवार, २१ जून रोजी विशेष ग्रामसभा बोलवून आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. शुक्रवार, २३ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब) जिल्हाधिकारी मान्यता देतील. सोमवार, २६ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवार, २७ जून ते सोमवार ३ जुलै या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. शुक्रवार, ७ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देण्यात येईल. बुधवार, १२ जुलै रोजी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी मान्यता देतील. तर शुक्रवार, १४ जुलै रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्ध देण्यात येईल, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)