राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली दौरा निश्चित मात्र वर्धा जिल्ह्यातील दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती (President Draupadi Murmu's visit to Gadchiroli is fixed, but the visit to Wardha district has been cancelled, according to sources.)

Vidyanshnewslive
By -
0

नागपूर :- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 4 जुलै ते 6 जुलै 2023 पर्यंत विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत या दरम्यान महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 5 जुलैला  गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ व प्रशासकीय इमारतीच्या शिलान्यास सोहळ्यास उपस्थिती राहील तसेच नागपुरातील राजभवन परिसरात मुक्काम राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र या दरम्यान 6 जुलैला रोजी राष्ट्रपतींचा वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार होत्या तसेच या दरम्याम सेवाग्राम आश्रम येथील बापू कुटी येथे भेट देणार होत्या मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेनुसार 6 जुलैचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे विद्यापीठानं दौरा रद्द झाल्याची माहिती देत आहे मात्र त्यामागील नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)