महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या माजी प्र-प्राचार्य कल्याणी पटवर्धन मॅडम सेवानिवृत्त ; महाविद्यालयात निरोप समारंभाचं आयोजन (Former Vice-Principal of Mahatma Jyotiba Phule College Kalyani Patwardhan Madam retired; Organizing a farewell ceremony in the college)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या माजी प्रभारी -प्राचार्य कल्याणी पटवर्धन मॅडम सेवानिवृत्त ; महाविद्यालयात निरोप समारंभाचं आयोजन (Former in charge Principal of Mahatma Jyotiba Phule College Kalyani Patwardhan Madam retired ;  Organizing a farewell ceremony in the college)


बल्लारपूर :- आपल्या आयुष्याची जवळपास 27 वर्ष 8 महिने 8 दिवस अविरतपणे महाविद्यालयाची सेवा देऊन आज 30 जून रोजी बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या माजी प्र-प्राचार्य सौ. कल्याणी पटवर्धन(देशमुख) मॅडम सेवानिवृत्त झाल्या या दरम्यान त्यांनी महाविद्यालयात विविध विभागात सेवा दिल्या. या सेवा निवृत्तीच्या निमित्तानं आज महाविद्यालयात निरोप समारंभाच आयोजन करण्यात आलं होत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती  म्हणून मा. बादलशाह चव्हान, प्र-प्राचार्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, सत्कारमूर्ती सौ. कल्याणी पटवर्धन, मा. श्रीकांत देशमुख, मा. प्रा. डॉ. किशोर चौरे, (इतिहास विभाग प्रमुख), प्रा. दिवाकर मोहितकर (कनिष्ठ विभाग, वाणिज्य), ई ची विचारपिठावर उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली तदनंतर अतिथींचे स्वागत करण्यात आले. 


      यावेळी मा. कल्याणी पटवर्धन मॅडम यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या सेवा निवृत्तीच्या निमित्तानं शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रकाश मेश्राम, कनिष्ठ विभागातून प्रा. दिवाकर मोहितकर, वरिष्ठ विभागातून प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. डॉ. किशोर चौरे व प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे मॅडम ई नी मनोगत व्यक्त केलं या सत्काराला आपल्या भावना व्यक्त करतांना पटवर्धन मॅडम  म्हणाल्याकी " माझ्या या सेवा काळा दरम्यान मला प्रत्येक विभागाचे यथोचित सहकार्य लाभले दरम्यानच्या काळात विविध विभागात सेवा देऊन आज 27 वर्षाची सेवा करून आज मी निवृत्त होत असताना आनंदासह दुःख ही होत आहे मात्र शासकीय नियमाने सेवा निवृत्ती ही प्रत्येकांच्या आयुष्यात असतेचं. अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. तदनंतर आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना वेळेचं योग्य ते नियोजन करून प्रत्येकाचा समाधान करण्याचं कौशल्य पटवर्धन मॅडम यांना अवगत होत व येणाऱ्या भविष्यकाळात सुख समाधान व्यक्त करत सदिच्छा व्यक्त केल्या या दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणून प्रा. दिवाकर मोहितकर यांची तर वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणून प्रा. डॉ. विनय कवाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रा.सविता पवार मॅडम, संचालन प्रा.सतीश कर्नासे सर तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विनय कवाडे यांनी केली. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सुनिल कायरकर, प्रा.रजत मंडल, प्रा.ललित गेडाम, प्रा.रोशन साखरकर, प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा. पंकज कावरे, प्रा. पल्लवी जुनघरे, प्रा. सविता पवार, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा.मोहनीश माकोडे, प्रा. दिपक भगत, यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून अशोक गर्गेलवार, प्रकाश मेश्राम, शामराव दरेकर, सिद्धार्थ मोरे, विशालभाऊ व  विद्यार्थी वर्गाची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)