जागतिक पर्यावरण दिनी वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची आकाशवाणीवर "वनवार्ता" Forest Minister Naa. Sudhirbhau Mungantiwar's "Vanvarta" on AIR on World Environment Day

Vidyanshnewslive
By -
0

जागतिक पर्यावरण दिनी वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची आकाशवाणीवर "वनवार्ता" Forest Minister Naa. Sudhirbhau Mungantiwar's "Vanvarta" on AIR on World Environment Day

चंद्रपूर :- राज्याचे वन, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आकाशवाणीच्या माध्यमातून वनवार्ता या कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. वनमंत्री मुनगंटीवार वनांविषयीचे कुतूहल, गमतीजमती, रंजक गोष्टींपासुन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (ईको क्लब), वृक्ष लागवड यासंदर्भात आपले मनोगत ''वनवार्ता'' या कार्यकमात व्यक्त करतील. सोमवारी ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी आकाशवाणीवरुन सकाळी ८.४० वाजता ''वनवार्ता'' या कार्यक्रमाची सुरूवात होणार असून पुढे दर १५ दिवसांनी एका रविवारी सकाळी ७.२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून १५ मिनिटांचा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी एस.डी. चव्हाण यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)