राज्यातील पुणे व चंद्रपूर लोकसभेच्या 2 रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होणार ? निवडणूक आयोगाचं पूर्व तयारी करिता जिल्हाधिकारी यांचे कडे पत्र येऊन धडकल्याची माहिती (There will be a by-election for 2 vacant seats of Pune and Chandrapur Lok Sabha in the state? It is reported that a letter has been sent to the Collector for the preliminary preparation of the Election Commission)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- राज्यात खासदार गिरीश बापट आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यातील २ लोकसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. दोन खासदारांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक केव्हा लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामुळे लवकरच या मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता बळावली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास तयारी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक जुळवाजुळव सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. 

            दरम्यान, पुणे लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून अनेकांची नावं चर्चेत आहेत. महाविकास आघाडीत पुणे लोकसभा निवडणुकीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला मिळते हे पाहावे लागेल. चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा 30 मे रोजी झाला मृत्यू होता. त्यामुळे रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच निवडणूक घ्यायची झाल्यास आयोगाने त्यासाठी तयारी केल्याचे दिसून येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)