बल्लारपुरातील अनाथ भिकाऱ्यांची अन्न, वस्त्र व निवाऱ्याची पावसाळा संपेपर्यंत न.प. बल्लारपूरच्या मार्फत देखभाल करण्याची मागणी (Food, clothing and shelter of orphan beggars in Ballarpur until the end of the rainy season. Demand for maintenance through Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात मागील ८ ते १० वर्षांपासून अनाथ भिकाऱ्यांची संख्या वाढली असून ते दारोदार भटकून भिक मागून आपली उपजिविका भागवित आहेत आणि उघड्यावर ते राहत असून ऊन, थंडी, पावसाळा या ऋतुमधून कोणाच्याही आधार नसताना जात आहेत. त्यांच्याकडे आजपर्यंत कुणाचेही लक्ष गेले नाही किंवा कुणी लक्ष दिले नाही तसेच शासनाने सुद्धा त्यांची दखल घेतली नाही. २००८ पासूनच महाबोधी बुद्धा फाऊंडेशन ने पुढाकार घेऊन त्यांचे पुनर्वसन व्हावे व शासनाने योजनेप्रमाणे त्यांची दखल घ्यावी असे प्रयत्न चालविले आहेत. यावर्षी २०२३ जून महिण्यापासून पावसाळा सुरु होत असून भिकाऱ्यांचे हाल-अपेष्टा होऊ नये याकरिता नगर परिषद बल्लारपूरकडे उपलब्ध असलेल्या खोल्या त्यांना पावसाळा संपेपर्यंत राहण्याकरीता द्यावी. तसेच त्यांच्या अन्न, वस्त्रांची गरज पूर्ण करावी जेणेकरुन त्यांचे मध्ये परिवर्तन होऊन ते भिक मागणे सोडून देऊन स्वतःचे काम करुन पोट भरु शकतील अशी त्यांना आपणांकडून सांत्वना द्यावी आणि त्यांचे धैर्य वाढवावे. करीता हे निवेदन आपल्या सेवेशी सादर.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)