चंद्रपूर-घुग्गुस मार्गावर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू Horrific accident of four wheeler on Chandrapur-Ghuggus road, 4 people died on the spot

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर-घुग्गुस मार्गावर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू Horrific accident of four wheeler on Chandrapur-Ghuggus road, 4 people died on the spot


चंद्रपूर : जिल्हातील घुग्घुस-चंद्रपूर मुख्य मार्गांवर भीषण अपघात घडला आहे.या अपघातात एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाला.बोलेरो वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट कॅप्सूल ट्रकला धडक दिली. या धडकेत चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाने घटनास्थळ गाठले. यवतमाळ जिल्ह्यातील कुटुंब बोलेरोमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन पुरुषांसह दोन महिलांचा समावेश आहे. राजुरा येथील विवाह समारंभ आटोपून शेख परिवार यवतमाळ जिल्हातील मारेगाव या आपल्या गावी निघाला होता. मात्र मार्गातच ही भीषण घटना घडली. या घटनेने यवतमाळ जिल्हात शोककळा पसरली आही. मागील काही महिन्यात जिल्हात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष अपघाताला कारणीभूत असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील युसूफ नबिवस्ताद शेख, मुमताज युसूफ शेख, रफिक,नबीवस्ताद शेख, संजीदा रफिक शेख या जिल्हातील राजुरा येथे लग्नाला हजेरी लावल्यानंतर गावी निघाल्या होत्या. दोघे भाऊ आणि त्यांचा पत्नी वाहनात होत्या. घुग्घुस-चंद्रपूर मुख्य मार्गांवरील नागला पुलाजवळ बोलेरो वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट कॅप्सूल ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की या धडकेत बोलेरो वाहनातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली आहे. राजुरा येथील लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर यवतमाळला जात असलेल्या बोलेरोच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोलेरोनं लेन ओलांडून दुसऱ्या लेनवरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वळणाचा रस्ता असल्याचंही समोर आलं आहे. अपघातानंतर गाडीमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी कटर मागवलं आहे. चंद्रपूरमधील या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)