बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरातील खाली पाण्याच्या टाकीत पडलेल्या 3 वर्षीय अस्वलाला दिले वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवदान, केले निसर्गमुक्त ! Officials and employees of the forest department gave life to a 3-year-old bear that fell in a water tank in Ballarpur Power House area, made it free !

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरातील खाली पाण्याच्या टाकीत पडलेल्या 3 वर्षीय अस्वलाला दिले वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवदान, केले निसर्गमुक्त ! Officials and employees of the forest department gave life to a 3-year-old bear that fell in a water tank in Ballarpur Power House area, made it free !

बल्लारपूर :- दिनांक 01.06.2023 ला सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बल्हारपुर - चंद्रपुर मार्गावरील महापोरपण (पावर हाऊस) चे परिसरातील खाली पाण्याच्या टाकीत अस्वल वन्यप्राणी पडल्याची माहिती महापारेषण विभागाचे कर्मचारी यांचे कडुन वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त कर्मचारी यांचे सह मौका स्थळी तात्काळ हजर होवुन अस्वल या वन्यप्राण्यास वेशुध्द करून पाण्याच्या टाकीतुन बाहेर काढले व त्यानंतर रेस्क्यु करण्यात आलेली अस्वल या वन्यप्राण्याची श्री. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांनी तपासणी केली असता अस्वल हि मादी असुन तिचे वय अंदाजे 3 वर्षे इतके होते व ती सुदृढ असल्याने सदर अस्वल या वन्यप्रण्यास निसर्ग मुक्त करण्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सुचना दिल्या. श्रीमती. स्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर व श्री. श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनात व श्री. शेंडगे, परिविक्षाधिण सहाय्यक वनसंरक्षक यांचे उपस्थितीत सदर मोहीम यशस्वी करण्याकरीता श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. के. एन. घुगलोत, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह, वनरक्षक कु. वर्षा पिपरे, श्री. एस. एम. बोकडे, श्री. आर.आर. शिवणकर व अति शिघ्र दल, कोठारी व चंद्रपुर येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यामुळे अस्वल या वन्यप्राण्यास नविन जिवनदान मिळाला व तिला वनात निसर्ग मुक्त करण्यात आले. अशी माहिती नरेश रा. भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)