मार्च 2023 मध्ये झालेल्या 10 वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल 93.93%, कोकण विभाग अव्वल तर नागपूर विभाग शेवटचा ठरला March 2023 Class 10th Result Declared, State Total Result 93.93%, Konkan Division Topper, Nagpur Division Last

Vidyanshnewslive
By -
0

मार्च 2023 मध्ये झालेल्या 10 वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल 93.93%, कोकण विभाग अव्वल तर नागपूर विभाग शेवटचा ठरला March 2023 Class 10th Result Declared, State Total Result 93.93%, Konkan Division Topper, Nagpur Division Last

पुणे :- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावी च्या शालांत परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाने जाहीर केला असून तो २०२०च्या तुलनेत १.४७℅ कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी ९३.९३℅ टक्के निकाल जाहीर करण्यात आला आहे. याहीवेळी मुलींनीच बाजी मारली असून नागपूर विभाग शेवटच्या स्थानावर गेले आहे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२३ निकाल जाहीर केला असून दहावीचा निकाल ९३.९३ टक्के यंदाही कोकण विभागाने बाजी मारत ९८.११ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के एवढा लागला आहे. बोर्डाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. कोकण : ९८.११टक्के, कोल्हापूर : ९६.७३ टक्के, पुणे : ९५.६४ टक्के, मुंबई : ९३.६६ टक्के, औरंगाबाद : ९३.२३ टक्के, अमरावती : ९३.२२ टक्के, लातूर : ९२.६७ टक्के, नाशिक : ९२.२२ टक्के, नागपूर : ९२.०५ ट्क्के महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वीचा निकाल २०२३ जाहीर केला असून या संदर्भातील अधिक व विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दुपारी 1:00 नंतर कळेल अशी माहिती आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत,  (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)