महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आता " बकरी ईद " ची सुट्टी 28 ऐवजी 29 जूनला ! (According to the notification of the Maharashtra government, the "Bakri Eid" holiday is now on 29th June instead of 28th !)

Vidyanshnewslive
By -
0

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आता " बकरी ईद " ची सुट्टी 28 ऐवजी 29 जूनला ! (According to the notification of the Maharashtra government, the "Bakri Eid" holiday is now on 29th June instead of 28th !)

मुंबई :- शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील 'बकरी ईद'ची सार्वजनिक सुट्टी २८ जून ऐवजी २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील 'बकरी ईद'ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, २८ जून २०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र, हा सण गुरुवार, २९ जून २०२३ रोजी येत असल्यानं २८ जूनची सुट्टी रद्द करुन २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी काढली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं याची घोषणा केली आहे. दरम्यान, २९ तारखेलाच आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण आले आहेत. त्यामुळं दोन्ही सार्वजनिक सुट्ट्या एकाच दिवशी आल्यानं त्या ओव्हरलॅप झाल्या आहेत. पण शासनानं यापूर्वी २८ जून रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी २९ तारखेला अशा सलग दोन सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. पण आता शासनानं यात बदल केल्यानं या दोन्ही सुट्ट्याच एकाच दिवशी आल्यानं एकच सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)