चंद्रपुरातील अड. दिपक चटप यांचे फोटो उपराष्ट्रपतीच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम ई समाज माध्यमावर वर झळकले (In Chandrapur Add. Deepak Chatap's photo surfaced on Vice President's official Facebook, Instagram and social media)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुरातील अड. दिपक चटप यांचे फोटो उपराष्ट्रपतीच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम ई समाज माध्यमावर वर झळकले  (In Chandrapur Add. Deepak Chatap's photo surfaced on Vice President's official Facebook, Instagram and social media)

चंद्रपूर :- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या लंडन दौऱ्यावर होते दरम्यान, भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सुपुत्र व सध्या लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत असलेले ॲड.दीपक यादवराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपती धनगड व ॲड. दीपक चटप यांच्यात थेट संवाद झाला. या संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे या संवादात्मक भेटीचे फोटो उपराष्ट्रपतींच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले असून वायरल झाले आहेत. कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, "जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात युवकांची संख्या विपूल आहे. युवाशक्ती ही खरी राष्ट्रशक्ती असते. विदेशातील भारतीय हे इथले देशाचे अम्बेसिडर आहेत. तुमच्या शिक्षणाचा उपयोग देशकल्याणासाठी करावा. जात, धर्म, पक्ष आदी भेदाभेद बाजूला सारुन आपण भारतीय आहोत ही ओळख स्मरणात असू द्या." दरम्यान भाषणानंतर उपस्थितांशी थेट संवाद साधताना ॲड.दीपक चटप यांचीही उपराष्ट्रपतींनी विचारपूस केली. ‘मी चंद्रपूर जिल्ह्यातील चेवेनिंग स्कॉलर तरुण वकील आहे. शेतकरी, आदिवासी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत रचनात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो. वकीली व संसदीय धोरणनिर्मिती हे माझे मुख्य आवडीचे विषय. या दोन्ही स्तरावर तुम्ही केलेले काम दिशादर्शक वाटते’ असे हितगुज दीपकने केले. यावर स्मितहास्य करत उपराष्ट्रपती म्हणाले, ‘आपण करत असलेले काम कौतुकास्पद आहे. धोरणनिर्मिती आणि विधीक्षेत्र यांच्यात अनेक समान दुवे आहेत. त्यामुळे या दोन्ही स्तरावर योगदान देता येत आहे. तुमच्या सारख्या युवकांकडून अनेक आशा आहेत. उत्तमोत्तम काम करत राहा’ अशा सदिच्छा उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी व्यक्त केल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)