अखेर बल्लारपुरातील स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुले (Finally the swimming pool in Ballarpur is open for citizens)

Vidyanshnewslive
By -
0

अखेर बल्लारपुरातील स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुले (Finally the swimming pool in Ballarpur is open for citizens)

बल्लारपूर :- मे महिना जीवाची लाही लाही व्हायला सुरुवात होते शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या असतात या सुट्टीत मुलं समर कॅम्प किंवा पोहणे शिकायला  जात असतात कधी कधी पोहणं जीवावर बेततंय. त्यामुळं बल्लारपुरात प्रशिक्षित मार्गदर्शकाखाली स्विमिंग शिकायला मिळाली तर, याच उदात्त हेतूने बल्लारपूर शहरातील नगर परिषद बल्लारपूर द्वारा संचालित उभारण्यात आलेला डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड मधील जलतरण तलाव/ स्वीमिंग पूल कोरोनामुळे बंद अवस्थेत होता, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मा, विशाल वाघ यांचे प्रयत्नाने दिनांक 9. 5.2023 म्हणजे आजपासूनच  पूर्ववत स्वीमिंग पूल बल्लारपूर शहरातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होत आहे. तरी सर्व नागरिकांनी स्वतःचे स्वास्थ सुरळीत राहावे या हेतूने स्वीमिंग पूल चा वापर करावा असे आवाहन मुख्य अधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)