जिवती जवळ भिषण अपघात 2 घटनास्थळी मृत्यु तर 2 गंभीर जखमी (Fatal accident near Jivati ​​2 died on the spot and 2 seriously injured)

Vidyanshnewslive
By -
0

जिवती जवळ भिषण अपघात 2 घटनास्थळी मृत्यु तर 2 गंभीर जखमी (Fatal accident near Jivati ​​2 died on the spot and 2 seriously injured)

चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील केकेझरी येथील रहिवासी असलेला युवक व त्याचा मुलगा आणि इतर दोघेजण आपल्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना जिवती-परमडोली मार्गावरील रोडगुडा जवळील अपघातात बाप-लेक जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज ८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन राजाराम गायकांबळे (वय ४०), अनुष सचिन गायकांबळे (वय ७) वर्षे व जखमी दोघे हे चौघे  दुचाकीने केकेझरी आपल्या गावी जात असताना रोडगुडा जवळ परिसरातील पुलाला धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे अपघातात सचिन गायकांबळे व त्याचा मुलगा हा जागीच ठार झाला. तर राजेश गायकांबळे (वय ४) व रूषिकेश गायकांबळे ( वय १३) हे गंभीर जखमी झाले असुन जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. पुढील तपास जिवती पोलिस करित आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)