देशाचं नवं संसद भवन म्हणजे " सेन्ट्रल व्हिस्टा " सज्ज, लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता ? The country's new parliament building is "Central Vista" ready, the possibility of inauguration by Prime Minister Narendra Modi soon?

Vidyanshnewslive
By -
0

देशाचं नवं संसद भवन म्हणजे " सेन्ट्रल व्हिस्टा " सज्ज, लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता ? The country's new parliament building is "Central Vista" ready, the possibility of inauguration by Prime Minister Narendra Modi soon?

वृत्तसेवा :- सेन्ट्रल व्हिस्टा' विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली नव्या 'संसद भवन'ची इमारत सर्व सुविधांनी सज्ज झाली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे. याची तारीखही निश्चित झाली असून सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या २८ मे २०२३ रोजी याचं उद्घाटनं होणार आहे. पण अद्याप अधिकृतरित्या याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारचं सत्ताकेंद्र असलेलं हे नवं संसद भवन आता कामकाजासाठी सज्ज झालं असून भव्य सोहळ्यात २६ मे रोजीच याचं उद्घाटन होणार असल्याच्याही चर्चा यापूर्वी सुरु होत्या. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्रिकोणी आकाराच्या या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या बांधकामाला १५ जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात झाली होती, जे ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण होणार होतं. पण या काळात कोरोनाचा उद्रेक झाल्यानं आणि संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असल्यानं याच्या कामाला उशीर झाला. 

         नव्या संसद भवनासाठी ९७० कोटी रुपये खर्च आला असून या इमारतीत प्रवेशासाठी तीन मार्ग आहेत. या मार्गांना ग्यान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावं देण्यात आली आहेत. तसेच खासदार, व्हीआयपी आणि व्हिजिटर्सना प्रवेशासाठी यामध्ये स्वतंत्र मार्ग आहेत. या इमारतीत एक कॉन्टिट्युशन हॉल असणार आहे. यामध्ये देशाच्या लोकशाहीच्या वारशाची माहिती असणार आहे. दरम्यान, नवी दिल्लीतील सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाची इमारत उभारण्यात आली आहे. ६४,५०० स्वेअर मीटर जागेवर ही चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. या नव्या इमारतीत १,२२४ खासदार बसू शकतात. यांपैकी लोकसभेच्या सभागृहातची ८८८ सीटची क्षमता आहे. तर राज्यसभेच्या सभागृहात ३८४ खासदार बसू शकतात.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)