अबब ! चंद्रपुरातील भद्रावती येथे लग्नाची वरात निघाली ते ही चक्क उंटावरून (Abba! At Bhadravati in Chandrapur, the bridegroom left for the wedding on a camel)

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! चंद्रपुरातील भद्रावती येथे लग्नाची वरात निघाली ते ही चक्क उंटावरून (Abba!  At Bhadravati in Chandrapur, the bridegroom left for the wedding on a camel)

चंद्रपूर :- लग्नाची वरात घोडा, बैल बंडी, चारचाकी वाहन तथा विमानात देखील निघाली आहे. राजस्थानमध्ये उंटावर देखील नवरदेवाची वरात निघते. आता महाराष्ट्रमध्ये देखील उंटावर वरात निघाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे उंटावर वाजत गाजत ही वरात निघाली आहे. लग्न आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सोहळा त्यामुळेच लग्न बघावे करून असे बोलल्या जाते. आयुष्यात एकदाच होणारे लग्न अविस्मरणीय व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते आणि आपल्या मुलीची पाठवणी करताना आपल्या आयुष्यातील सर्व काही पणाला लाऊन वर पक्षांकडील मंडळींची बडदास्त ठेवतो. त्याचप्रमाणे आपले लग्न जगावेगळे व्हावे असे प्रत्येक नवरदेवाला वाटत असते. त्यामुळे लग्नाची वरात जास्तीत जास्त आकर्षक असावी, लग्नात मित्र परिवाराने मनमुराद आनंद लुटावा ह्यासाठी महागडे बँड, डी जे, लावुन कुणी महागड्या गाड्या सजवून तर कुणी आकर्षक पांढऱ्या घोड्यावरून वरात घेऊन जातात. भद्रावती तालुक्यातील आष्टा येथिल एम. ए. बी. एड्. असलेला कृषी केंद्र संचालक नवरदेव अमोल संतोषराव पडवे ह्याचे लग्न यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथिल जया देवरावजी वैद्य हिच्याशी ठरल्यानंतर विवाह सोहळा आपल्या गावातच करण्याचा निर्णय घेतला. आपले लग्न अविस्मरणीय व्हावे असे स्वप्न बघणाऱ्या अमोलने आपल्या लग्नाची वरात जगावेगळ्या पद्धतीने काढण्याचे ठरवून वरातीसाठी चक्क उंट मागवला व उंटावर बसुन थेट लग्न मंडपात पोहचला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)