महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग इंग्रजी माध्यमाचा निकाल 100% लागला, अनेक विद्यार्थ्यांचं सुयश (Department of Commerce of Mahatma Jyotiba Phule College English medium result was 100%, much to the delight of many students)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग इंग्रजी माध्यमाचा निकाल 100% लागला, अनेक विद्यार्थ्यांचं सुयश (Department of Commerce of Mahatma Jyotiba Phule College English medium result was 100%, much to the delight of many students)

बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित स्थानिक बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कला वाणिज्य महाविद्यालयाचा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे 12 वी च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाचा एकूण निकाल 72.16% लागला आहे विशेष म्हणजे वाणिज्य विभागाचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 100% लागला आहे कु. शिवानी रजक हिने 82.17% गुण घेऊन महाविद्यातुन प्रथम आली आहे तर द्वितीय सुमित गिरडकर यांनी 54.17% गुण मिळविले आहे तर मराठी माध्यम वाणिज्य विभाग निकाल 70% लागला आहे. यात कु. तनुश्री अमृत आतमांडे 61.00% प्रथम तर कु. दीक्षा भास्कर वांढरे यांनी 61.00% गुण पटकाविले 12 वी कला शाखेतून हर्षल धनवलकर यांनी 74.50% गुण मिळवून प्रथम, रविकुमार रामकेश 65.67% गुण मिळवून द्वितीय व कु. आरती बोनकुरवार हिने 65.50% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकानी व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)