3 हजार कोटींतून अजिंठ्यातील 74 एकर परिसरात जगातील पहिलं पाली विद्यापीठ उभारणार, पाली अँड बुद्धिझम इन्स्टिट्यूटने तयार केला डीपीआर (The Pali and Buddhism Institute has prepared a DPR to set up the world's first Pali University in 74 acres of land in Ajantha with 3 thousand crores.)

Vidyanshnewslive
By -
0

3 हजार कोटींतून अजिंठ्यातील 74 एकर परिसरात  जगातील पहिलं पाली विद्यापीठ उभारणार, पाली अँड बुद्धिझम इन्स्टिट्यूटने तयार केला डीपीआर (The Pali and Buddhism Institute has prepared a DPR to set up the world's first Pali University in 74 acres of land in Ajantha with 3 thousand crores.)

वृत्तसेवा :- अजिंठा येथे ७४ एकरांत जगातील पहिले पाली विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आराखड्यासह सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास विद्यापीठाच्या कामालाही प्रारंभ होईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमचे सचिव भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी दिली. अजिंठा लेणी परिसरात ७४ एकर जमीन खरेदी करून इन्स्टिट्यूटने दक्षिण कोरियाशी करार केला आहे. विद्यापीठासाठी तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात बुद्धविहार, ग्रंथालय, संग्रहालय, गार्डन, पाली भाषा ग्रंथालयासह पाली भाषेचे सर्व उपविषय शिकवण्यात येणार आहेत. सांचीतून आणला दगड विद्यापीठ परिसरात गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना यापूर्वीच केली आहे. येथे अनेक धम्म परिषदांचे आयोजन केले जाते. मूर्तीसाठी एक कोटी खर्च करण्यात आला. मूर्तीचा दगड मध्य प्रदेशातील सांची येथून आणला आहे. मूर्तिकार देखील सांचीचे होते. त्यामुळे अनोखे बुद्धरूप येथे पाहावयास मिळते. सर्व भाषांची विद्यापीठे आहेत, पालीचे का नको?जगात संस्कृत, हिंदी, उर्दू भाषेची विद्यापीठे आहेत. पाली भाषा प्राचीन असूनही कुठेच विद्यापीठ नव्हते. त्यामुळे आम्ही पाली भाषेचे विद्यापीठ सुरू करणार आहोत. जगभरातील विद्यार्थ्यांना करता येईल अभ्यास पाली अँड बुद्धिझमवर देशातील विविध विद्यापीठांत शैक्षणिक विभाग आहेत. मात्र जगात स्वतंत्र विद्यापीठ नाही. अजिंठा येथील लेणीच्या पायथ्याशी हे विद्यापीठ अस्तित्वात आले तर जगभरातील विद्यार्थ्यांना पाली भाषेचा अभ्यास करता येईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)