बुद्ध जयंतीच्या पर्वावर बल्लारपुरात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन, बुद्ध पहाट, " कर्मयोगी गाडगेबाबा " महानाट्य, धम्मप्रबोधनाचे आयोजन (On the occasion of Buddha Jayanti, organizing an educational program in Ballarpur, Buddha Pahat, "Karmyogi Gadgebaba" grand play, organizing Dhamma Prabodhana.)

Vidyanshnewslive
By -
0

बुद्ध जयंतीच्या पर्वावर बल्लारपुरात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन, बुद्ध पहाट, " कर्मयोगी गाडगेबाबा " महानाट्य, धम्मप्रबोधनाचे आयोजन (On the occasion of Buddha Jayanti, organizing an educational program in Ballarpur, Buddha Pahat, "Karmyogi Gadgebaba" grand play, organizing Dhamma Prabodhana.)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात ५ मे रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विविध संघटनांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील बुद्ध पौर्णिमा समारोह समिती पेपर मिल बल्लारपूरच्या वतीने कलामंदिरच्या रंगमंचावर करण्यात आले आहे. याशिवाय अकोला येथील विचारवंत इतिहास अभ्यासक महेंद्र शेगावकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम ५ मे रोजी सायंकाळी 6:00 वाजता असून सायंकाळी 7:00 वाजता बुद्धजयंती उत्सव २०२३ निमित्त कृती थिएटर अँड स्पोर्ट अकादमी नागपूरनिर्मित ५० कलावंतांच्या सहभागाने संत  गाडगेबाबा यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित महानाट्य 'कर्मयोगी गाडगेबाबा' या महानाटकाचे आयोजन पेपर मिल कलामंदिरच्या रंगमंचावर होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन मा. दीप्ती सूर्यवंशी पाटील, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, मा. उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर, मा.उदय कुकडे बिजीपीपीएल युनिट प्रमुख राहणार आहेत तरी  या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्ध पौर्णिमा समारोह समितीच्या सदस्यांनी केले आहे. याशिवाय बल्लारपूर शहरातील विद्यानगर वॉर्डातील भिक्षू निवास, पाली विद्यालय, बुद्ध विहार समितीच्या वतीने ४ व ५ मे रोजी विहाराच्या मैदानावर बुद्ध जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत अनिरुद्ध शेवाळे हे बुद्ध पहाट कार्यक्रमात भीम बुद्ध गीतांनी प्रबोधन करणार आहेत. दोन्ही दिवस देहदान व नेत्रदान करणाऱ्या नागरिकांनी भिक्षु निवास येथे आपली नावनोंदणी करण्याचं आवाहन सुध्दा समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे एकूणच बुध्द जयंतीच्या पर्वावर बल्लारपूर कराना एक प्रबोधनात्मक मेजवानी मिळणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)