चंद्रपूर जिल्ह्यातील 12 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह, महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित होणार सन्मानचिन्ह (12 police officers and employees of Chandrapur district will be awarded the badge of honor by the Director General of Police, the badge will be distributed by the guardian minister on Maharashtra Day.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- जिल्ह्यातील १२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राकरिता निवड झाली आहे. या सर्वांचा १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उत्तम कामगिरीबद्दल उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षक श्रीमती राधिका सुनिल फडके, जिल्हा विशेष शाखेचे फौजदार चरणदास कुसन दाजगाये, माजली पोलीस ठाण्यातील सफौ. घनश्याम हावसुजी गुरनुले, नक्षल विरोधी अभियान पथकातील सफौ. चंद्रकांत श्रीहरी पेंद्दीलवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोहवा. अरुण लक्ष्मण हटवार, वरोरा पोलीस ठाण्यातील पोहवा. राजेश केशवराव वऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोहवा. लायक महादेव ढाले, घुग्घुस पोलीस ठाण्यातील पोहवा. इंद्रपाल सुकराम गोंगले, पडोली पोलीस ठाण्यातील अशोक नामदेवराव गर्गेलवार, नापोअं. पुरुषोत्तम कैलास चिकाटे, सायबर चंद्रपूर मधील नापोअं. प्रशांत ताराचंद लारोकर, प्रविण चंदु रामटेके यांना जाहीर झाले आहे. पोलीस महासंचालक सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी कौतुक करून गौरविले. सदर पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र महाराष्ट्र दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त १ मे रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)