चंद्रपूरसह जिल्ह्यात उन्हाळ्यात बरसतोय मुसळधार पाऊस, झाडे कोसळली तर कुठे विज आणि पाणी पुरवठाही खंडीत ! (It is raining heavily in summer in the district including Chandrapur, if the trees fall, the electricity and water supply will be cut off !)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूरसह जिल्ह्यात उन्हाळ्यात बरसतोय मुसळधार पाऊस, झाडे कोसळली तर कुठे विज आणि पाणी पुरवठाही खंडीत ! (It is raining heavily in summer in the district including Chandrapur, if the trees fall, the electricity and water supply will be cut off !)

चंद्रपूर :- जिल्ह्यात रात्रभर आणि पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. कडक उन्हाच्या एप्रिल महिन्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस, वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास आकाशात ढग एकत्र येवून जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास चाललेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र पुन्हा रात्री आठ वाजताचे सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊसामुळे नाल्यामधील कचरा रस्त्यावर आल्याने महापालिकेच्या स्व्च्छता मोहिमेची पोलखोल झाली आहे. या जिल्ह्यात एप्रिल महिना हा कडक उन्हाळ्यासाठी ओळखला जातो. मात्र या महिन्यात सातत्याने पाऊस पडत आहे. मागील आठ दिवसापासून वादळ वारा, विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात १ मे पर्यंत वादळी वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्‍ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पाऊसामुळे शेतात उभे असलेले मिरची, मक्का, ज्वारी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस व वादळी वाऱ्याने शहर तथा जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा देखील खंडित झाला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)