आता राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयात असतील जनसंपर्क अधिकारी, वरिष्ठ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे असेल जबाबदारी (Now every RTO office in the state will have a Public Relations Officer, senior clerical staff will have the responsibility)

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- राज्यभरात परिवहन विभागासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाला दिली जात नाही. त्यामूळे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालायांमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सुचना दिल्या आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधीत कार्यालयातील वरिष्ठ लिपीक असलेल्या कर्मचाऱ्यांकडे जनसंपर्क अधिकाऱ्यांची जबाबदारी दिली जाणार आहे. प्रत्य़ेक आरटीओमधील वर्तमान पत्रांच्या बातम्यांचे कात्रन दुपारी 12 वाजेच्या आत परिवहन आयुक्त कार्यालयात पाठवण्यात येणार आहे. परिवहन विभागात पहिल्यांदाच याप्रकारे प्रत्येक कार्यालयात जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने, आता परिवहन आयुक्तांची नजर चौफेर राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी गजानन लागु यांच्याशी सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांना संपर्कात राहण्याच्या सुचना दिल्या आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)