रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत बोर्डा-वायगाव परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याच रामनगर पोलिसांचं आवाहन (The dead body of an unknown person was found in the Borda-Vaigaon area within Ramnagar police station limits, Ramnagar police appealed for identification.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरापासून अंदाजे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बोर्डा वायगाव रोड वरील तामगाडगे फार्म हाऊस जवळ रोड पासून 200 मीटर अंतरावरील जंगल परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला सदर मृतकाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असून अंगावर कथ्या रंगाची ली कूपर लिहिलेली हाफ टी शर्ट, लाल रंगाचा हाफ पॅन्ट परिधान केलेला आहे, केस पूर्णपणे गळलेले (टक्कल) आहेत. मृतदेह अंदाजे मागील 3-4 दिवसांपासून पडलेला असावा कारण मृतदेह फुगलेल्या व किडे लागलेल्या अवस्थेत आहे. सदर मृतक इसमाच्या वर्णनाचा कोणाचा नातलग हरवला असल्यास किंवा सदर मृतदेहाची ओळख पटल्यास रामनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन रामनगर पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात आले आहे. या बाबतीत जिल्ह्यातील सदर वर्णनाचा कुणीही व्यक्ती हरविला असल्यास वा या प्रकरणाची तक्रार दाखल असल्यास रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपुर येथे संपर्क साधावा. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)