चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील नंदुरी टोलनाक्याजवळ ट्रक-ट्रॅव्हल्स चा अपघात, अनेक गंभीर असल्याचं वृत्त (Truck-travel accident near Nanduri toll booth on Chandrapur-Nagpur highway, many are reported to be serious)

Vidyanshnewslive
By -
0

वरोरा -: चंद्रपूर - नागपूर महामार्गांवरील वरोरा तालुक्यातील नंदुरी टोल नाक्याजवळ डीएनआर ट्रॅव्हल्स- ट्रक अपघातात अनेकजन जखमी झाले आहे. या संदर्भातील वृत्त असे की, चंद्रपूर - नागपूर महामार्गांवर वरोरा जवळ नंदोरी टोल नाका नवीन उड्डाणं पुलाजवळ आज दुपारी 2:30 ते 3:00 वाजता च्या सुमारास नागपूर ला जात असलेल्या DNR ट्रॅव्हल्स क्र. एम.एच. ३४ बी एच ७५७७ तर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एम.एच. ३४ ए बी ३८४० ला धडक दिली. यात अनेक प्रवासी व चालक जखमी झाल्याचे कळले आहे तर ट्रॅव्हल्स चा समोर चा भाग चेंदमेंदा झाला. त्वरित जखमींना प्रवाशांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जखमींची नावे वृत्त लिहीपर्यंत कळू शकली  नाही. यासंदर्भातील पुढील तपास वरोरा पोलीस करित आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)