नागपुरातील हिंगणा एमआयडीसी परिसरातील एका कम्पनीत भीषण आग 3 मजूर होरपळून ठार तर 3 गंभीर जखमी असल्याचं वृत्त, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश (A massive fire broke out in a company in Hingana MIDC area of ​​Nagpur, 3 laborers were killed and 3 were seriously injured, the fire was brought under control.)

Vidyanshnewslive
By -
0

नागपूर :- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असते. सध्या विदर्भात सुर्य आग ओकत आहे अशातच नागपुर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी MIDC मधिल सोनेगाव निपाणी येथे कटारिया ॲग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याची माहीती असून विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली तर ह्या आगीत 3 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागून 3 कामगारांचा मृत्यु झाल्याच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले आहे. वृत्त येई पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपुरचे जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून असल्याची माहीती असून या घटनेची माहीती कळताच हिंगणा येथील तहसिलदार हे तातडीने घटनास्थळी पोहचले आहे. व अग्निशमन विभागाच्या माध्यमातून तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)