बौद्ध उपासक-उपासिका संघ व महाबोधी बुद्धा फाऊंडेशन आंबेडकर वार्ड बल्लारपूर द्वारा आयोजित, त्रिविध परमपावन वैशाख बुद्ध पोर्णिमेनिमित्य बल्लारपूरात पाच दिवसीय 'बुद्धमहोत्सव' संपन्न
एकल नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार वृन्मय वाकडे, द्वितीय पुरस्कार पूर्वी करमनकर व तृतीय पुरस्कार पूर्वी सातपुते यांनी तसेच ग्रुप डॉन्स स्पर्धेत प्रथम पुरस्कार जयभीम ग्रुप, द्वितीय पुरस्कार श्रावणी ग्रुप व तृतीय पुरस्कार कुमुद ग्रुप यांनी प्राप्त केले. यावेळी अंकित उमरे याला त्याच्या दातृत्वासाठी श्रुती लोणारे हिला तिच्या प्राणीमात्र संगोपनाकरीता व मनोज बोकाडे याला त्याच्या दातृत्वासाठी बुद्ध महोत्सवात सम्मानचिन्ह देवून सम्मानित करण्यात आले. 19 मे २०१२ ला भदंत डॉ. यशकाश्यपायन महाथेरो (माजी विद्यार्थी केंब्रिज युनिव्हसिटी, इंग्लंड, माजी हायप्रिस्ट महाबोधी महाविहार बोधगया) यांनी बुद्ध तत्वज्ञान समजविले बौद्ध धम्म हा संप्रदाय नसून ती एक आचार जीवन पढ़ती आहे. बौद्धांनी धर्मांध न होता व्यक्ति म्हणून सर्व धर्मातील, समाजातील लोकांना मैत्री व करुणेने वागवावे. दुसऱ्यांच्या कल्याणावरच आपले कल्याण अवलंबून आहे. नंतर दानकर्म व पुण्यानुमोदन झाले. २० मे २०१२ ला बुद्धमहोत्सवाचा भोजनदानाने समारोप झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण व सूत्रसंचालन मनोज उमरे महाबोधी बुढा फाऊंडेशन यांनी केले. २००८ पासून सम्यक नियोजन सम्यक वितरण, आपल्या दानातून आपलाच उध्दार व विकासाचे समाजकारण या संकल्पनेतून बुद्धमहोत्सव व इतर कार्य सातत्याने सुरु आहे. कुएं की मिट्टी कुएं में लगाना अशाप्रकारे समाजातील प्रतिभासंपन्न व अभ्यासु मुलांना दानातून प्राप्त भांडवलाचा उपभोग झाला पाहिजे, या महोत्सवाचा प्रत्येक लाभ प्राप्त झाला पाहिजे व समाजसुख निर्माण व्हावे तसेच समाजात ऋणानुबंध निर्माण व्हावे हाच बुद्ध महोत्सवाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन मनोज उमरे यांनी केले. तसेच गरीब व गरजवंत मुलींचा विवाह सोहळा आयोजित करण्याचे मानस त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या बुद्धजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष रोशन शिंदे यांनी वर्गणी मागून समाजाला त्रस्त न करता उदारदायकांनी पुढे येवून समाजहित साधावे असे आव्हान केले. आभार प्रदर्शन श्रद्धा देशभ्रतार यांनी मानले. कार्यक्रमाच्या सफलतार्थ अंकित उमरे, कुमार तुरकर, अहिसंक भरणे, मनोज आवारे, विजय चिकाटे, माँटू सातपुते, बापू खरतड, श्वेता उमरे, रेशमा शिंदे, सुदर्शन भिमणवार यांनी अथक परिश्रम केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या