Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

कळमना बांबू डेपो ला लागलेली आग व संबंधित कंपनीची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, "आप" ची मागणी.

कळमना बांबू डेपो ला लागलेली आग व संबंधित कंपनीची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, "आप" ची मागणी.


बल्लारपूर :- दिनांक २२/०५/२०२२ ला बल्हारपुर पेपर मिल च्या कळमना येथील बांबु लकडा डेपो ला लगलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित, कंपनी, विभाग व अधिकारी वर योग्य कठोर व न्यायोचित कार्यवाही करने बाबत Adv.किशोर मधुकर पुसलवार,जिल्हा विधी सल्लागार, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी साहेब, चंद्रपुर, आणि मा.उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांना मा.तहसीलदार साहेब, बल्लारपूर यांच्या मार्फतीने आज दिनांक.२७-०५-२०२२ रोजी या तक्रार आणि निवेदन द्वारे आम आदमी पार्टी, बल्लारपूर शहर समिती आणि जिल्हा समिती मार्फत मागणी करण्यात आली आहेत. त्या मध्ये बल्लारपूर येथील BGPPL पेपर मिल च्या कळमना येथील बांबु व लकडा { कच्चा माल } डेपोला दिनांक २२/०५/२०२२ ला आग लागुन मोठ्याप्रमाणात बांबु व लकडा व परिसरातले झाडे व पेट्रोल पंपा पर्यंत आग पोहचली व सारे अनगीनत प्राकृतिक संपादन, कच्चा माल व इतर झाडे व भुसा भस्मसात झाले तसेच यामुळे पर्यावरणाची सुध्दा भारी हानि झाल्याने व या साठी पेपर मिल प्रशासन सर्वस्वी जवाबदार असुन त्यांच्या ढीसाळ कारभाराचा अप्रत्यक्षरीत्या परीणाम परिसरातील जनतेला भोगावा लागतो, याची नुकसान भरपाई त्यांना मिळाविच. परिसरातील शेतकरीही या अग्निकांड ग्रसित झाले त्याच्या नुकसानाचे पंचनामे करण्यांत यावेत व त्या शेतकरी बांधवांना तसेच पिडीत पेट्रोल पंप आणि इतर पिडीत लोकांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच खालील मुद्यावर आपल्या स्तरांवर चौकशी करण्याची मागणी सुद्धा आम आदमी पार्टी द्वारा करण्यात आलेली आहेत. 

१) जिल्हयातील फायर अधिकारी / अग्निशामक दलाचे अधिकारी यांची सुध्दा चौकशी करावी की, BGPPL पेपर मिल प्रशासनाने पर्याप्त फायर मानकांची व्यवस्था केली होती किंवा नाही.

२) त्या घटना स्थळात / ठिकाणी BGPPL कंपनीने बांबू, लाकडा व कच्चा माल ठेवण्या करीता कोणत्या अधिकारी व विभागाचे मंजुरी घेतले होते.

३) आवश्यकते प्रमाणे त्या ठिकाणी पाणी पूर्तता ची व्यवस्था BGPPL कंपनीने का केले नव्हते ? 

४) BGPPL कंपनीने बांबू डेपो मध्ये कोण-कोणते सावधगिरीचे उपाय करून ठेवले होते व त्याचा निरीक्षण कोणत्या अधिकारी व विभागाने केले होते.

५) BGPPL कंपनी ने अश्या प्रकारे बेजवाबदार नियोजना मुळे त्या परिसरातील नागरिकांना, जनावरांना तसेच प्रकृती ला जाणूनबुजून नुकसान पोहचविला आहेत त्यांचे वर अश्या प्रकारचे कृत्य व बेजवाबदार घटनाची पुनरावृत्त होऊ नये या उद्धेश्याने कठोरतेणे नियमांचा पालन करण्यास बाध्य करण्यात यावे व दंड बसविण्यात यावे. 

६) BGPPL कंपनीने बल्लारपूर शहराला लागून त्यांचे नवीन कॉलोनी जवळ पंडित दीनदयाल वार्डला लागून असलेल्या कंपनीचा भिंतीच्या बाजूने व पूर्वी निवासी करीता असलेल्या जागेवर नियमांचा उल्लंघन करून बेकायदेशीर रीत्या त्या ठिकाणी कळमना सारखे बांबू डेपो व पेपर साठी लागणारा कच्चा माल जमा करून ठेवले आहेत त्याही ठिकाणी सुद्धा कळमना सारखीच गैर-सोय असून नियामचा जानुन-बुजून कोणतेही सावधगिरीचे उपाय योजना शिवाय धोक्याचा काम करत आहेत.

 ७) BGPPL कंपनी च्या मार्फतीने त्यांचे बांबू डेपो, कच्चा मालच्या स्थानका वरून वाहतूक करणार्या वाहन सुद्धा शहरातून वाहतूक करताना ट्राफिक नियमांचा उल्लंघन करतात ज्या मुळे रस्त्या वर चालणारे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात पडण्याची दाट शक्यता नेहमी राहते. तरी उपरोक्त सर्व विषयांची रीतसर व उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी व भविष्यात अश्या प्रकारे दुर्दैवी अग्निकांड घडू नये या करीता कार्यवाही करण्याची सावधगिरी बाळगण्याची तरतूद करून व संबंधित कंपनी, अधिकारी व विभागावर योग्य व कठोर व दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहेत. या वेळी आम आदमी पार्टीचे शहर समितीचे पदाधिकारी शहर महिला अध्यक्ष सौ.अलकताई वेले जी, शहर सह संयोजक श्री.अफ़ज़ल अली जी, शहर महिला सह सचिव सौ.शीतल झाड़ेजी, व वरिष्ठ कार्यकर्ते श्री.शमशेरसिंग चौहान, श्री.अशोक नायुडु जी, श्री.उमेश कडु जी, श्री.आशीष गेडाम जी, श्री.स्मित ताकसांडे जी, श्री.नबी पठान जी उपस्थित होते. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या