कळमना येथील बल्लारपूर पेपर मिल च्या बांबू डेपोला भीषण आग

Vidyanshnewslive
By -
0

कळमना येथील बल्लारपूर पेपर मिल च्या बांबू डेपोला भीषण आग 


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या पेपर मिल ला कच्चा माल हा बांबू स्वरूपात पाहिजे असतो पूर्वी हा कच्चा माल बल्लारपूर शहरातील न्यू कॉलोनी परिसर किंवा राज्य महामार्गावर उभे राहायचे मात्र यामुळे वाहतुकीला अळथळा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पेपर मिल ला लागणारा कच्चा माल म्हणजे बाबू च्या साठी कळमना परिसरात बांबू डेपो निर्माण कऱण्यात येऊन या ठिकाणी बांबूची साठवणूक केली जायची मात्र आज रविवारला  दुपारी 3 वाजताच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपो ला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे विशेष म्हणजे बल्लारपूर नगर परिषद, बल्लारपूर पेपर मिल, चंद्रपुर महानगरपालिका सह अन्य ठिकाणच्या 5 ते 6 अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे जवळचं एक पेट्रोल पंप असुन या आगीने उग्र स्वरूप धारण केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे या घटनेची माहिती कळताच पोलिस विभाग व प्रशासन घटनास्थळी पोहोचले असुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेमकी आग कशामुळं लागली या कारणाचा शोध घेणं सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार घटनास्थळी 12 ते 13 ठिकाणच्या अग्निशमन विभागाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असुन बल्लारपूर पेपर मिल च्या अधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)