रानडुक्कराच्या हल्ल्यात महिला जखमी, कोठारी येथील घटना ; चंद्रपुरात शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
बल्लारपूर :- चंद्रपुर-गडचिरोली जिल्हा हा वनाने व्यापलेला आहे त्यामुळं या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे तसेच मानवी समाजाने वन्य प्राण्यांच्या क्षेत्रावर अतिक्रमण केल्यामुळं वन्य प्राणी वर्तमान स्थितीत मानवी वस्तीत येऊन धुमाकूळ घालत असले तरी वनविभागाच्या तत्परतेने सद्यस्थिती वन्यजीव-मानवी संघर्षात कमी आली असली तरी आज 18 मे 2022 च्या सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास मौजा कोठारी, तालुका बल्लारपूर येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सखुबाई श्रावण टेकाम, वय-60 वर्ष, ही आपल्या गावाजवळच शेण जमा करण्यासाठी गेल्या असता रान डुक्कराने त्यांच्यावर हल्ला केल्याचं वृत्त असुन या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असुन त्यांचेवर चंद्रपुर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच या घटनेचा पुढील तपास वनविभाग व पोलिस करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या