अबब ! एक फिलीस्तीनी पाउंड ची नोट चक्क 1.3 कोटी रुपयाला विकली गेली. विशेष म्हणजे मूळ किंमतीच्या 1400 पट अधिक किंमत मिळाली
वृत्तसेवा :- दुर्मिळ नोटा-नाणी जमवण्याचा छंद अनेकांचा असतो. काही लोक एखादं नाणं किंवा नोट लकी समजतात. अशा नोट आणि नाण्यांचे ऑनलाईन लिलावही होतात . ज्यासाठी लोक लाखो रुपये मोजतात. अशीच एक नोट सध्या चर्चेत आली आहे, जी तब्बल 1.3 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. कोट्यवधी रुपयांना विकल्या गेलेल्या या एका नोटेत इतकं काय खास आहे, हेच जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे. विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार लंडनच्या स्पिंक ऑक्शन हाऊसमध्ये या नोटेचा लिलाव करण्यात आला. एका चॅरिटी दुकानात एका बॉक्समध्ये ही नोट सापडली. पॉल वायमन नावाच्या व्यक्तीला ऑक्सफॅममध्ये वॉलिटिअरिंग करताना दान केलेल्या वस्तूंच्या बॉक्समध्ये ही नोट दिसली. त्यानंतर त्याने एका ऑक्शन हाऊसशी संपर्क केला. जिथं तज्ज्ञांनी याचं मूल्यांकन £30,000 (30000 पाऊंड) केलं. पॉल वायमन म्हणाला, माझ्या हातात असं काही आहे, जे नक्कीच दुर्मिळ आहे, असं मला वाटलं होतं. जेव्हा ही नोट £140,000 विकली गेली तेव्हा मला विश्वासच बसला नाही. लिलाव करणाऱ्यांनी याचं मूल्य £30,000 ठरवलं. पण जेव्हा त्याचा लिलाव झाला तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. 28 एप्रिलला या नोटेचा ऑनलाईन लिलाव झाला. जगभरातील लोकांनी या नोटेसाठी बोली लावली. तेव्हा नोटेला त्याच्या मूल्याच्या 1400 पट अधिक किंमत मिळाली आहे. तब्बल £1,40,000 ला म्हणजे 1.3 कोटी रुपयांना ही नोट विकली गेली. मिररच्या रिपोर्टनुसार ही नोट एक फिलिस्तीन पाऊंड आहे. ही नोट फिलिस्तानी नोट आहे. £100 (जवळपास 1 हजार रुपये) फिलिस्तानी पाऊंड.1927 साली फिलिस्तानात ब्रिटिशकाळात ही नोट जारी करण्यात आली. ही नोट खूप दुर्मिळ आहे. या नोटेच्या लिलावातून मिळालेली रक्कम ऑक्सफॅमच्या धार्मिक कार्यांसाठी वापरली जाणार आहे. ऑक्सफॅममार्फत ही नोट शोधणाऱ्या पॉल आणि ब्रेंटवूड शॉप टीमचे आभार मानण्यात आले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या